• 7875751143
  • 9767226752
  • Brahmani ,Kalmeshwar Nagpur

Facility

ग्रंथालय

महाविद्यालयाचे सुसज्ज असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयात शैक्षणिक अभ्यासक्रमास आवश्यक असलेली पुस्तके, शैक्षणिक अभ्यासक्रमास पूरक संदर्भ ग्रंथ,विश्वकोश, मासिके, स्पर्धा परीक्षेस उपयुक्त ग्रंथ असे एकूण ३००० चे वर पुस्तके उपलब्ध आहेत. आधुनिक युगातील स्पर्धेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोन जागतिक स्तरावर व्हावा या हेतूने यावर्षी महाविद्यालयात डिजिटल लायब्ररी करण्यात मानस आहे.

ग्रंथालयाचे नियम

१) महाविद्यालयात प्रवेशित सर्व विद्यार्थी ग्रंथालयातील ग्रंथाचा वापर करू शकतात.
२) सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना B.T. Card दिले जाईल. हे कार्ड सत्र संपेपर्यंत सांभाळून ठेवणे प्रत्येक विद्यार्त्यांची जबाबदारी आहे. हरवल्यास २०/- रु. तात्काळ भरून दुसरे कार्ड ग्रंथपाल यांच्याकडून मागून घ्यावे.
३) पुस्तके घेतांना ती पाहून घ्यावी. पुस्तकातील काही पाने घाल झालेली असल्यास,फाटलेली असल्यास त्वरित ग्रंथपालांच्या निदर्शनास आणून द्यावी. अन्यथा परत करतांना त्या पुस्तकाची रक्कम विद्यार्थ्यास भरावी लागेल.
४) दिलेल्या कालावधीत पुस्तके ग्रंथालयात जमा करावी. अन्यथा दरदिवशी १ रुपया याप्रमाणे भुर्दड आकारला जाईल.
५) नेलेली पुस्तके मुदतीत जमा करावी. पुस्तके हरविल्यास त्या पुस्तकाची किंमत अदा करावी लागेल किंवा महाविद्यालयास दुसरी प्रत संबंधित विद्यार्थ्यास आणून घ्यावी लागेल.
६) ग्रंथालयात येतांना सोबत ओळखपत्र असावे. अभ्यासाकरिता ग्रंथालयातील वाचनकक्षाचा वापर करावा व त्याठिकाणी शांतता राखणे हे प्रत्येक विद्यार्थांचे कर्तव्य आहे.

प्रयोगशाळा

महाविद्यालयात मानसशात्र, विज्ञान, संगणक,शैक्षणिक तंत्रज्ञान या विषयाच्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. तसेच विविध विषयाचे अभ्यासपूरक मॉडेल्स, चार्ट्स महाविद्यालयात उपलब्ध आहेत.