• 7875751143
  • 9767226752
  • Brahmani ,Kalmeshwar Nagpur

About Us

श्री. तुकाराम ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री.एम.डी.बोंडे (पाटील) बी. एड. कॉलेज, कळमेश्वर जि. नागपूरची स्थापना परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांची बी.एड. प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, श्री. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचा समाज सुधारणेचा आदर्श समोर ठेवून सन २००७ साली करण्यात आली.

महाविद्यालयाचे विद्यमान मा. अध्यक्ष आमदार श्री. अशोकराव मानकर (आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य), सचिव डॉ. रमेशजी ढोरे,कोषाध्यक्ष मा. डॉ. राजीवजी पोतदार, संचालक मा. प्रकाशजी वरूळकर, मा. रविंद्रजी अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय सतत प्रगतीपथावर आहे.

महाविद्यालयाचा अभ्यासू व मेहनती कर्मचारी वर्ग हे महाविद्यालयाचे आगळे वेगळे वैशिष्ठ्य आहे. गामीण भागातून आदर्श शिक्षक घडविण्याचा महाविद्यालयाचा सतत प्रयत्न असतो. आजच्या या संगणक युगात शिक्षकही ज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर व्हावा या दृष्टिकोनातून महाविद्यालयातच ‘महाराट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र‘ (MSCIT) या अभ्यासक्रमाची सत्र २००९- १० पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. विद्यार्थी हातातच महाविद्यालयाचे हित सामावले आहे. या भूमिकेतून व्यवस्थापन मंडळ, अध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी याच्या सहभागाने प्रत्येक कृती घडत असते.