• 7875751143
  • 9767226752
  • Brahmani ,Kalmeshwar Nagpur

Admissions

अ) प्रवेश क्षमता – महाविद्यालयीन प्रवेश क्षमता प्रथम वर्षाच्या ५० जागा आणि द्वितीय वर्षाच्या ५० जागा अशा एकूण १०० जागा आहेत.

ब) प्रवेश पात्रता –
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीपरीक्षेमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५०% व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान ४५% गुण मिळालेले आहेत असे विध्यार्थी बी.एड. प्रवेशास पात्र राहतील व महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील सर्व संवर्गातील उमेदवारांना ५०% गुण मिळणे आवश्यक राहील.

२) सीईटीला खुला संवर्ग इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्ग यांना ५० पैकी किमान १८ गुण, मागास संवर्गाला किमान १५ गुण व महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील सर्व संवर्गातील उमेदवारास किमान १८ गुण मिळाले असतील तर तो प्रवेशास पाठ राहील.

३) शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या व किमान दोन वर्षे पूर्ण वेळ सेवा झालेल्या उमेदवारास नियमित बी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. मात्र त्यांना किमान शेकडा गुणांची अट लागू राहणार नाही. मात्र संवर्ग निहाय सीईटीच्या गुणांची अट लागू राहील. तसेच संबंधित जिल्ह्याचे मा. शिक्षणाधिकारी यांचे मान्यताप्राप्त शिक्षक असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

प्रवेश अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या सत्यलिपी जोडाव्यात.

 

१) नुकतेच काढलेले २ पासपोर्ट साईज फोटो.

२) CET Score Card

३) CET Admit Card

४) अलीकडील महाविद्यालय सोडल्याचा दाखला T.C.

५) तिन्ही वर्षाच्या गुणपत्रिका (B.A.,B.Com.,B.Sc.)

६) पदवी प्रमाणपत्र

७) पदव्युत्तर परीक्षेच्या गुणपत्रिका (M.A.,M.Com.,M.Sc.) असल्यास.

८) पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र.

९) एस.एस.सी. व एच.एस.सी. प्रमाणपत्र व गुणपत्रिका

१०) जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र(असल्यास)

११) Non-creamy Layer Certificate(New)

१२) Gap Certificate असल्यास(शिक्षणात खंड असल्यास)

१३) शिष्यवृत्ती आदेश क्रमांक

१४) स्थानांतरण (Migration) प्रमाणपत्र (असल्यास)

१५) जिल्हा बदली प्रमाणपत्र (नागपूर जिल्याव्यतिरिक्त असल्यास)

१६) पात्रता प्रमाणपत्र (Eligibility) असल्यास

१७) डी.एड.,बी.पी.एड., शिक्षण प्रशिक्षण विषयक पदवी,पदविका गुणपत्रिका व प्रमाणपत्र (असल्यास)

१८) N.S.S., N.C.C. खेळ व क्रीडा सांस्कृतिक सहभाग विद्यापीठ, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर इत्यादी संबंधित प्रमाणपत्र (असल्यास)
१९) स्वातंत्र्य सैनिकाचे पाळ्या असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
२०) शारीरिकदृष्ट्या अपंगत्व्य प्रमाणपत्र (असल्यास) (सिव्हिल सर्जन यांनी प्रमाणित केलेले)
२१) प्रकल्पग्रस्थ, भूकंपग्रस्त, अवर्षण ग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास) (सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे)
२२) माजी सैनिक, माजी सैनिकाचा पाल्य तसेच सैन्य दलात सक्रिय असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
२३) विवाहित मुलींकरिता विवाह प्रमाणपत्र

माध्यम – महाविद्यालयातील अध्यापनाचे माध्यम मराठी राहील.

शुल्क – अ) महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यास शिक्षण शुल्क समिती मुंबई यांनी निर्धारित केलेले शिक्षण शुल्क व विद्यापीठाने निर्धारित केलेले विद्यापीठ शुल्क एक रक्कमी भरावे लागेल.
ब) पाठ टाचण वही,पाठ निरीक्षण वही, अंतिम पाठ वही, सूक्ष्म अध्यापन वही, मानसशास्त्र प्रयोग वही, स्वाध्याय लेखन वही व इतर साहित्य महाविद्यालयातून पुरविल्या जाईल. त्याचे शुल्क विद्यार्थ्यास अतिरिक्त भरावे लागतील. बाहेरील विद्यापीठातील विद्यार्त्यांना विद्यापीठ नामांकन शुल्क स्वतः भरावे लागेल.